आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून लोकं अनेक फळ व भाज्यांच्या रसाचे सेवन करतात. मात्र दुधी भोपळा प्राणघातक ठरू शकतो हे पुन्हा एकदा कळून आले आहे. दुधी भोपळाच्या रसाचे सेवन केल्यानं पुण्याच्या एका महिलेचा मृत्यू झाला. पुण्यातील 41 वर्षीय महिला इंजीनियरचा मृत्यू धक्कादायक आहे.
12 जून रोजी महिलेने जॉगिंग केल्यानंतर ग्लासभर दुधी भोपळ्याचा रस प्यायला. महिलेला कुठलाही आजार नव्हता. रस पिण्याच्या अर्ध्या तासानंतर त्यांना जुलाब आणि उलट्या होऊ लागल्या. उपचारासाठी लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि 16 जूनला तिचा मृत्यू झाल्याची बातमी आहे.
डॉक्टरांप्रमाणे महिलेला दुधी भोपळ्याचा रस सेवन केल्याने ब्रेन हॅमरेज झाले असून तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांप्रमाणे याआधीही या प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 2011 मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या समितीने दुधीचा रस कडू लागल्यास तो पिऊ नये, असे सांगितले आहे. तसेच कडू दुधी भोपळ्यात विषारी तत्त्व आढळतात, ज्याने मृत्यू ओढवू शकतो.