Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला, रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळंही झाली खुली

रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला, रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळंही झाली  खुली
, शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (18:52 IST)
रायगड किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. याबाबत  रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेश काढले आहेत. रायगड जिल्ह्यातील सर्व पर्यटनस्थळं खुली करण्यात आली आहे. दरम्यान, इथे येणाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर बंधनकारक असणार आहे. 
 
रायगड जिल्‍हयातील सर्व गडकिल्‍ले आणि पर्यटन स्‍थळे तसेच स्‍मारके खुली करण्‍यात आदेश रायगडच्‍या जिल्‍हाधिकारी निधी चौधरी यांनी काढले आहेत. मागील आठ महिन्‍यांपासून कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे या सर्व ठिकाणी कोणालाही प्रवेश दिला जात नव्‍हता. ही ठिकाणे खुली करावीत अशी मागणी विविध संस्‍था, संघटना, दुर्गप्रेमींकडून केली जात होती.  याआधी महाड येथील मनोज खांबे यांनी आमरण उपोषणाचा इशाराही दिला होता. त्यानंतर प्रशासनाने ही स्थळे खुली करण्याबाबत आश्वासन दिले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अर्णब गोस्वामी प्रकरणी शिवसेनेने काय गमावलं? आणि काय कमावलं?