Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी 10 कोटी रू निधी मंजूर

बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठी 10 कोटी रू निधी मंजूर
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी डिसेंबर, 2016 च्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून 10 कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला असून या व्यतिरिक्त चंद्रपूर शहरात 17 कोटी रू. किंमतीची अन्य विकासकामे मंजूर करण्यात आली आहे.
 
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक 15 ऑगस्ट 2016 रोजी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम निसर्ग उद्यानाच्या लोकार्पण सोहळयात बाबूपेठ परिसरातील स्टेडियमच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची पूर्तता त्यांनी केली असून बाबूपेठ परिसरातील स्टेडियमच्या सौंदर्यीकरणासाठी 1.50 कोटी रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे शहरातील पठाणपुरा गेट ते बिनबा गेट बायपास रोडच्या बांधकामासाठी 10 कोटी रू. निधी, चंद्रपूर शहरातील बायपास रोड - महादेव मंदिर - समता चौक - नेताजी चौक - बालाजी मंदिरापर्यंतच्या रस्त्याच्या बांधकामासाठी 5.50 रू. निधी मंजूर करण्यात आला आहे.
 
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरातील रेल्वे उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी या आधीही 15 कोटी रू. निधी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला आहे. या आधी दिनांक 15 ऑक्टोबर 2016 रोजीच्या नगर विकास विभागाच्या पत्रान्वये महानगरपालिकांना वैशिष्टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान या शीर्षाअंतर्गत चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी 20 कोटी 12 लक्ष रू. निधी त्यांच्या पुढाकाराने मंजूर करण्यात आला असून या अंतर्गत प्रामुख्याने शहरातील कोणेरी अर्थात कोहिनूर स्टेडियमचे नूतनीकरण, प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाचे नूतनीकरण, पोलीस विभागाकरिता अत्याधुनिक जीमचे बांधकाम, आधुनिक पध्दतीच्या पथदिव्यांची उभारणी आदी विकास कामांचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रवादी क्रमांक एकचा पक्ष: सुनील तटकरे