राज्यात मान्सूनचे आगमन झाले आहे. पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली आहे. मुम्बईत पावसाची दमदार सुरुवात झाली असून मुंबईत पहिल्या पावसातच पाणी साचल्याचा बातम्या येऊ लागल्या मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असून अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. सलग दोन ते तीन तास पाऊस सुरु होता. पावसामुळे णज भागात पाणी साचलं. पावसामुळे नाले तुडुंब भरले असून मुंबईतील सायन सर्कल, अंधेरी सबवे, दहिसर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाणी साचलं. सायन किंग्ज सर्कलवर पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली. पहिल्या पावसाचे पाणी काढण्यासाठी पालिकेने पंप लावून साचलेले पाणी काढले.
पावसामुळे रेल्वे आणि रस्त्याच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकल सेवा देखील पावसामुळे बाधित झाली. लोकल 15 ते 20 मिनिट उशीरा धावत होत्या. मुंबई महापालिकेने नात्यांची स्वच्छता करण्यासाठी सुमारे 150 कोटी रुपये खर्च केले असून देखील मुंबईत अनेक भागात पाणी तुंबल्याचं दिसून आले आहे.