Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिंडोशीतील मनसेच्या 'संवाद कार्यकर्त्यांशी' मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!

दिंडोशीतील मनसेच्या 'संवाद कार्यकर्त्यांशी' मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!
मुंबई , सोमवार, 10 एप्रिल 2017 (10:51 IST)
दिंडोशी विभागातील मनसे संघटन शक्तीला आलेली मरगळ झटकण्यासाठी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी मनसैनिकांशी दिलखुलास संवाद साधला. रविवारी, ९ मे च्या संध्याकाळी मालाड पूर्व च्या कोकणी पाड्यातील नर्मदा सभागृहात झालेल्या 'संवाद कार्यकर्त्यांशी' ह्या मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकच गर्दी केली होती.
 
यावेळी बैठकीस उपस्थित असलेले वरिष्ठ मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, संजय चित्रे, सरचिटणीस सौ. रीटाताई गुप्ता, राजा चौगुले, राजेंद्र शिरोडकर, आदित्य शिरोडकर, सचिव प्रमोद पाटील आदी नेत्यांनी मनसैनिकांची मतं जाणून घेतली. कार्यकर्त्यांनी सुद्धा आतापर्यंत पक्षात काम करताना आलेले अनुभव शेअर केले. पदाधिका-यांमधील आरोप-प्रत्यारोप सादर होताना अंतर्गत कलह, मतभेद ही समोर आले. काही मनसैनिकांनी निवडणुकीदरम्यान आलेले चांगले-वाईट अनुभव संवाद करताना मांडले. विभागातील पक्ष वाढीसाठी काय काय करता येईल ह्यासाठी च्या विविध सुचना काही मनसैनिकांनी तोंडी तर काहींनी​ लेखी सादर केल्या. राज ठाकरेंच्या विचाराप्रणित मनसैनिकांना सक्षम करणा-या कार्यशाळा घेणे, अंगिकृत व बेसिक पदाधिकाऱ्यांनी मिळुन विभागातील समस्या सोडविणे, विभागात 'स्पाय' यंत्रणा राबविणे, जुन्या पदाधिकाऱ्यांनाही सोबत घेत त्यांना एखादी विशेष जबाबदारी सोपविणे. कॉलेजच्या तरुणांपासून ते वरिष्ठ नागरिकांपर्यंत मनसेच्या प्रभावी कार्यशैलीची ओळख करून देणे, निवडणूकीदरम्यान पक्षाशी फितुरी करणा-यांची दखल घेणे अश्या नानाविध संकल्पना मनसे कार्यकर्त्यांनी मनमोकळेपणाने व्यक्त केल्या.
 
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या घरी तयार केलेला चिवडा लाडक्या मनसैनिकांना वाटत "आम्ही अजुनही खचलेलो नाही, पुन्हा एकदा सज्ज होऊन नवनिर्माणाच्या कार्याला सज्ज आहोत" असा आत्मविश्वास जागवत मनसैनिकांचे मनोधैर्य वाढविले. कार्यकर्त्यांच्या भावना, त्यांच्या संकल्पना जाणून घेऊन याच निष्ठावंत मनसैनिकांच्या जीवावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा गरुडभरारी घेणार हेच ह्या कार्यक्रमातून दिसुन आले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एनडीए महत्वपूर्ण बैठक, राष्ट्रपती निवडणुकीची चर्चा होणार