Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रझा अकादमीला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे-सुधीर मुनगंटीवार

sudhir mungantiwar
, मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (08:30 IST)
‘ वंदे मातरम्’ म्हणायचं, अशा आशयाचं वक्तव्य भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर अनेक राजकीय नेत्यांनी याला विरोध केला होता. रझा अकादमीने देखील यावर तीव्र आक्षेप घेतला होता. वाढत्या विरोधानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण हॅलोऐवजी केवळ ‘वंदे मातरम्’ हाच शब्द वापरा, असं म्हटलं नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे.
 
मुनगंटीवार यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटलं की, “रझा अकादमीला विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इंग्रजांनी किंवा विदेशातून आलेल्या ‘हॅलो’ शब्दाऐवजी ‘वंदे मातरम्’ शब्द वापरावा, हे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आमच्या विभागाचं सुरू केलेलं अभियान आहे. एखादा व्यक्ती ‘वंदे मातरम्’च्या तोडीचा शब्द वापरत असेल किंवा राष्ट्रभक्ती, देशभक्ती व्यक्त करणारा शब्द वापरत असेल, तर त्याला आमचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही.”
 
पुढे मुनगंटीवार यांनी सांगितलं की, “हॅलो, हा शब्द जर रझा अकादमीसाठी देशभक्तीची प्रेरणा देणारा असेल, तर प्रश्न उपस्थित नाही होत. शेवटी असा कोणताही कायदा केला नाही. आम्ही १५ ऑगस्ट ते २६ जानेवारी दरम्यान सर्व देशभक्तांच्या माध्यमातून हे अभियान सुरू करत आहोत. ‘वंदे मातरम्’ हे स्वातंत्र्यवीरांच्या ओठांवरचे पवित्र शब्द आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

RILs मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबियांना ताज्या धमक्या, मुंबई पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले