चिंबळी फाटा, चाकण येथील कंपनीत 26 लाखांचा दरोडा घातला आहे. याप्रकरणी सहा पुरुष व दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहाटे तीनच्या सुमारास द व्ही टेक प्रा. लिमिटेड या कंपनीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी शशीमोहन नरेंद्र देव शर्मा (वय 36, रा. भोसरी, मुळगाव बिहार) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा पुरुष व दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शुक्रवारी (दि.25) पहाटे तीनच्या सुमारास द व्ही टेक प्रा. लिमिटेड या कंपनीत प्रवेश केला. त्यांनी त्याठिकाणी असलेल्या दोन सुरक्षारक्षकांना मारहाण केली व त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना जागीच दाबून ठेवले.
त्यानंतर आरोपींनी शटर उचकटून कॉपर, पीबी, कॉपर मिक्स, कॉपर रॉड, कॉपर स्क्रॅप व बारा हजार किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 25 लाख 87 हजार किंमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून पळवला. पोलीस उपनिरीक्षक चिटमपल्ले अधिक तपास करत आहेत.