Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

Webdunia
शनिवार, 13 एप्रिल 2024 (15:14 IST)
उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, भाजपाने गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्याकडून साढे पाचशे कोटीचा निधी घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया द्यावी.असे राऊत म्हणाले तसेच राऊत भाजपवर टीका करत म्हणाले की, यांच्या चेहऱ्याला लहान मुले घाबरतात. गब्बर नंतर लोक यांचेच नाव घेतात. व मोदींचा चेहरा की मुखवटा हे आता देशच ठरवेल. मोदींवर टीकास्त्र करत राऊतांनी वक्तव्य केले. तसेच घासून पुसून गुगुळीत मोदींचे नाणे झाले आहे. बाजारात आता मोदी चालत नाही. तसेच कालबाह्य झालेला बावनकुळे हा ढबु पैसा आहे. मटण हा काय श्रावणात प्रचाराचा मुद्दा आहे का व एवढा खाली घेऊन येत असतील प्रचाराची पातळी एवढी खाली आणतील. त्यांना पराभवाची भीती आहे. भाजपने गोमांस निर्यात करणाऱ्या पाच कंपन्यांकडून निधी घेतला असून मटण खाल्लेले बरे भ्रष्टाचाराचे शेण खाण्यापेक्षा असे म्हणत राऊतांनी टीकास्त्र सोडले आहे. 
 
लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाच्या विरोधात उमेदवार मिळत नाही. ही जागा लढवण्यावरून वाद आहेत. तसेच शिवसेनेच्या समर्थनार्थ अनेक मुस्लिम समोर येत आहेत. या संविधान रक्षणासाठी अनेक मुस्लिम संस्था आणि दलित एकत्र येत आहेत. तसेच राऊत म्हणालेत की, शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी होत आहेत  व लातूर आणि जालनामध्ये देखील बदल  होईल. महाविकास आघाडीच्या धडकेने आदर्श टॉवर कोसळून पडेल. आम्ही त्यांचा दारून पराभव करणार आहो. आम्हाला देखील राजकारण कळते. आम्ही अतोनात प्रयत्न केलेत प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत राहावे म्हणून, त्यांना आम्ही सहा जागा दिल्यात, प्रेमपूर्वक हात जोडलेत. तसेच एकत्रित येण्याची विनंती पृथ्वीराज चौहान यांनी केली त्यांच्याविषयी कायम आमच्या मनात आदर राहील. राऊत म्हणालेत की, अनेकांशी प्रकाश आंबेडकर यांच वाद सुरु आहेत. त्यांचा काळ व भूमिका वेगळीच होती. आमचे दरवाजे त्यांच्यासाठी कायम उघडे आहेत.

Edited By- Dhanashri Naik 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

एनडीएच्या विजयाबद्दल भाजपच्या विनोद तावडे यांचे पंतप्रधान मोदी आणि महायुतीच्या नेत्यांचे कौतुक

LIVE: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024: पक्षाची स्थिती

LIVE: आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघात विजय

आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघात विजय, मिलिंद देवरांचा पराभव

Who will be Maharashtra's next CM फडणवीसांनी शिंदेंना तर अमित शहांनी पवारांना फोन केला, काय बोलणे झाले जाणून घ्या

पुढील लेख
Show comments