Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दापोली-लाटवणमध्ये खवल्याची तस्करी करणारे जेरबंद

Scab khavale
, सोमवार, 2 जानेवारी 2023 (14:56 IST)
मंडणगड लाटवण-दापोली मार्गावर खवल्या मांजराची तस्करी करणाऱया तिघा संशयितांना मुद्देमालासह पोलिसांनी पकडले आहे. यातील एकजण तेथून फरार झाला आहे. नववर्षात खेड, मंडणगड पोलिसांसह वनविभागाने ही संयुक्त कारवाई केली.
 
मंडणगड पोलीस ठाणे हद्दीमधील लाटवण-दापोली रोडवरील घाटातून काही व्यक्ती वन्यजीवी प्राणी, खवले मांजराच्या खवले विक्रीसाठी वाहतूक करणार असल्याची गुप्त बातमी मिळाली होती. त्यानंतर खेड पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल मंडणगड यांच्यासह खेड व मंडणगड पोलीस ठाणे यांचे संयुक्तीक पथक तयार केले व या पथकासह लाटवण-दापोली रोडवरील घाटामध्ये येऊन सापळा रचला. अगदी थोडय़ाच वेळात घाटातून एका दुचाकीवरून 3 इसमांना संशयितरित्या जाताना या पथकाने थांबवले व लागलीच त्यांची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यात असलेल्या एका पिशवीत वन्यजीवी प्राणी, खवले मांजराचे 4.372 किलो वजनाचे खवले सापडले. या दरम्यान आणखीन एक संशयित इसम आपल्या चारचाकी वाहनासह तेथे आल्याचे पाहून पोलीस पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु अंधाराचा फायदा घेऊन हा इसम आपल्या वाहनासह तेथून फरार झाला आहे.
 
या कारवाईमध्ये तिघा इसमांना, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 2 9 39 (2), 48, 49 व 51 प्रमाणे मंडणगड पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून दुचाकी व मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. तसेच या गुह्यामधील वन्यजीवी प्राण्याची (खवले मांजराची) हत्या / शिकार कोठे झाली आहे? व अन्य फरार व्यक्तीला शोधण्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. ही कारवाई खेड पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे, पोलीस मुख्यालय पो.कॉ. मोरे,   खेड पोलीस ठाण पो.कॉ. झेंडे, मंडणगड पोलीस ठाणे पो.कॉ. माने,  मंडणगड वनपाल अनिल राजाराम दळवी यांनी संयुक्तपणे केली.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गेली मागील दोन वर्षे कोरोनाचा काळ होता म्हणून कमी अवयवदान झाले गेल्या वर्षभरात अवयवदानाचा आकडा वाढला