Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खळबळजनक.. नाशिकमध्ये पुन्हा खून.. 14 दिवसांत 7 खून..

murder
, बुधवार, 1 जून 2022 (22:00 IST)
नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच असून पुन्हा एकदा गंगापूररोड पोलिस ठाणे हद्दीत आणखी एका खुनाची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका तरुणाचा धारदार शस्त्राने वर करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शहरातील गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाईपलाईन रोडवर एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. धारदार शस्त्राने वार करून या युवकाचा खून केल्याची प्रथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला महिला पोलिस कर्मचारी सरला खैरनार  यांनी अटक केली आहे. दरम्यान, महिला पोलिस कर्मचारी सरला खैरनार यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

दरम्यान, नाशिक शहरातील गेल्या चौदा दिवसांमधील हा सातवा खून आहे. शहरातील एकामागून एक सुरु असलेल्या खून सत्रामुळे नाशिक हादरले असून, आज झालेल्या या खुनामुळे पुन्हा एकदा नाशिकमध्ये खळबळ पसरली आहे. एका पाठोपाठ एक तरुण मुलांच्या खुनाच्या घटना घडत आहेत. काही घटनांमध्ये अतिशय क्षुल्लक कारणावरून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामदास आठवले यांनी शिवसेनेवर काव्यमय टीका केली-शिवसेनेने दिला आहे आपल्याला धोका ...