Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवणार

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांची साक्ष नोंदवणार
, शुक्रवार, 9 जुलै 2021 (15:31 IST)
कोरोगाव-भीमा याठिकाणी 1 जानेवारी 2018 रोजी हिंसाचार झाला होता. याप्रकरणी ‘एनआयए’ने आठ जणांविरुद्ध 10 हजार पानांचे आरोपपत्र विशेष एनआयए न्यायालयात दाखल केले आहे‌. याप्रकरणी आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची साक्ष नोंदवली जाणार आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी यापूर्वी केला होता.

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन केलेल्या आयोगाची मुदत गतवर्षी एप्रिल महिन्यात संपली होती. त्यानंतर त्याला मुदतवाढ मिळाली, मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्याचे काम ठप्प होते. आता 2 ऑगस्टपासून आयोगाचे कामकाज सुरू होत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत.

न्यायमूर्ती जे. एन. पटेल हे कोरेगाव भिमा चौकशी आयोगाचे अध्यक्ष आहेत.शरद पवारांचीही साक्ष नोंदवली जाणार असल्याचं या अगोदरच सांगण्यात आलं होतं.आता, चौकशी आयोगाचे वकिल आशिष सातपुते यांनी 2 ऑगस्ट पासून साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात येत असल्याचे सांगितले आहे.

केंद्रीय तपास यंत्रणेने आनंद तेलतुंबडे, गौतम नवलखा,हनी बाबू, सागर गोरखे, रमेश गायचोर, ज्योती जगताप, स्टेन स्वामी आणि मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठ जणांविरूद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कामाला जात नाही म्हणून काठीने झोडपून पत्नीची हत्या