अहमदनगर मध्ये एका 30 वर्षीय महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.महिलेच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून साडीच्या पदराने गळा आवळून तिचा खून केला.एवढेच नवे तर महिलेच्या चेहऱ्यावर केमिकल टाकून तिचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न देखील केला गेला. या मुळे महिलेची ओळख पटू शकली नाही.ही सदर घटना श्री गोंदा तालुक्यातील सुरेगाव शिवारात ची आहे.
महिलेचा मृतदेह सुरेगावातील एका शेतात आढळून आला.या घटनेच्या माहिती बद्दल गावकरांनी पोलिसांना कळवले.हत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अज्ञात मारेकरी विरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास करत आहे.