Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवेसेनेने केंद्राच्या अहवालाचा विपर्यास केला - मुख्यमंत्री

शिवेसेनेने केंद्राच्या अहवालाचा विपर्यास  केला - मुख्यमंत्री
, गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (09:20 IST)
केंद्राच्या अहवालात वॉर्डनिहाय वित्तीय माहिती देण्यात मुंबई महापालिकेला शून्य गुण, नागरी कामाबद्दल शून्य गुण, पारदर्शक कारभाराबाबत शून्य गुण आहेत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. मुख्यमंत्री म्हणाले, “अर्धवट वाचलं किंवा चुकीचे सल्लागार ठेवले, तर तोंडघशी पडायला होतं, तसं शिवसेनेचं झालं आहे. उद्धव ठाकरेंच्या सल्लागारांनी अहवाल नीट वाचला असता, तर लक्षात आलं असतं की, मुंबई महापालिकेची इज्जत राज्य सरकारमुळे वाचवली.” मुंबईचा इतका विकास झाला की, मुंबईचा ‘पाटणा’ झाला, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला टोमणा मारला. मुलुंडमध्ये झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिक पोलिस प्रभागातील उमेदवाराचे क्रिमिनल रेकॉर्ड नि:शुल्क देणार