Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्हणून उर्मिला मातोंडकर यांनी संजय राऊत यांच्या कन्यांचे मानले आभार

म्हणून उर्मिला मातोंडकर यांनी संजय राऊत यांच्या कन्यांचे मानले आभार
, बुधवार, 2 डिसेंबर 2020 (17:13 IST)
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या कन्या विधिता आणि पूर्वशी राऊत यांचे आभार मानले आहेत. उर्मिला यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान, पक्षप्रवेशानिमित्ताने संजय राऊत यांच्या दोन्ही मुलींनी उर्मिला यांचा सांज श्रृंगार केला होता. त्यानिमित्ताने उर्मिला यांनी विधिता आणि पूर्वशी यांचे इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकत आभार मानले आहेत
 
विधिता आणि पूर्वशी यांचा ‘अलमारी’ हा डिझायनिंग स्टुडिओ आहे. विधिता कॉस्च्युम डिझाईन करतात, तर पूर्वशी ज्वेलरी डिझाईन करतात. विधिता आणि पूर्वशी गेल्या चार वर्षांपासून या क्षेत्रात आहेत. उर्मिला यांचा कालचा पेहराव विधिता यांनी तयार केला होता, तसंच आभूषणे पूर्वशी यांनी तयार केली होती. उर्मिला मातोंडकर यांचा ]पेहराव आणि आभूषणेही विधिता आणि पूर्वशी यांनीच डिझाईन केली होती. 
 
सध्या सुरू असलेल्या बिग बॉस या रिऍलिटी शो मधील काही सेलिब्रेटी स्पर्धकांसाठीही विधिता आणि पूर्वशी कॉस्च्युम आणि ज्वेलरी डिझायनींगचे काम करतात. बॉलिवूड आणि विविध क्षेत्रातील सेलेब्रिटी विधिता आणि पूर्वशी यांनी डिझाईन केलेले कपडे आणि आभूषणे वापरतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाली येथे भीषण अपघात, गॅस पाईपलाईनची पाइप बसमध्ये धडकली