Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तलवारी, रिव्हालव्हर ,सोन्या चांदीचे दागिने ,रोख रक्कमेसह ३० लाखाचा मुद्देमाल जप्त सराईत टोळीचा म्होरक्या जेरबंद

jail
रत्नागिरी , शुक्रवार, 14 जुलै 2023 (07:33 IST)
सिंधुदुर्गनगरी :कर्नाटक, गोवा व महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 45 घरे फोडीकरून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा यांचेकडून जेरबंद करण्यात आले आहे . तलवारी,रिवॉल्व्हर ,सोने,चांदीचे दागिने ,रोख रक्कमेसह ३० लाखाचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली
 
12. जुलै 2023 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप निरीक्षक श्री. शेळके, सहा. पोलीस उप निरीक्षक श्री. कोयंडे, पोहेको 903 जामसंडेकर, पोहेकॉ 167 केसरकर, पोकों 655 इंगळे असे शासकीय गाडीने कणकवली पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार प्रकाश विनायक पाटील वय 38 वर्षे रा. घर नं. 74, घाटवाडा, पडोसे, सत्तरी नॉर्थ गोवा हा त्याच्याकडील कार नं. जीए- 05/एफ-4601ने प्रवास करताना मिळून आला. त्यास ताब्यात घेवून त्याच्याकडे सखोल चौकशी करता, त्याच्याकडून 1 गावठी कट्ठा, 3 जिवंत राऊंड, काडतूस बंदूक, 27 जिवंत काडतूसे, 5 तलवारी, रोख रक्कम रु. 4,69,950/-, लोखंडी हातोडे, पक्कड, कटावणी, 11 विविध कंपन्यांचे मोबाईल | हेन्डसेट 166 ग्रॅम 16 मिली वजनाचे सोन्याचे दागिने किंमत रुपये 9,68,490/-, 5 किलो 300 ग्रॅम चांदीच्या विटा व दागिने किंमत रुपये 3,35,844/-, पैसे मोजण्याची ईलेक्ट्रीक मशिन, सोने चांदी वितळविण्याची ईलेक्ट्रीक मशिन, 3 ड्रिल मशिन, एक दुचाको व एक चार चाकी वाहन असा एकूण 30,48,784/- रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाणे गु.र.क्र. 194/23 कलम 3,25, 4,25 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास कणकवली पोलीस ठाण्यामार्फतीने सुरु आहे.
 
आरोपी प्रकाश पाटील हा घरफोडी चोरी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याचेविरुध्द सिधुदुर्ग जिल्हयामध्ये 8 गुन्हे, कोल्हापूर जिल्हयामध्ये 9 गुन्हे, गोवा राज्यात 4, कर्नाटक राज्यात 24 असे एकूण 45 गुन्हे दाखल आहेत. तसेच तो काही गुन्हयांमध्ये पाहिजे व काही गुन्हयांमध्ये फरार आरोपी म्हणून घोषीत आहे. सदर आरोपी विरोधात कणकवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करून सदर आरोपीकडून हस्तगत करण्यात आलेली अग्नीशस्त्र व घातक तलवारी, कोयता, चाकू, सुरा यांचा कोणत्या कारणासाठी साठा केलेला होता याबाबत सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चिपळूण लहान मुलाच्या अपघातानंतर उघड्या चिराखाणींची उच्च न्यायालयाकडून दखल