कर्जत नगरपंचायत निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार व भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे या दोन नेत्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती.
कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं बाजी मारली आहे.राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकत एकहाती सत्ता काबिज केली आहे. राष्ट्रवादीनं 12, काँग्रेसनं 3 तर भाजपला केवळ दोन जागा जिंकता आल्या.दरम्यान रोहित ने जी मेहनत घेतली त्याच फळ मिळाले अशा शब्दांत अजित पवार यांनी रोहित पवार यांच निवडणुकीत विजयी झाल्याने कौतुक केल आहे
17 जागा असलेली कर्जत नगरपंचायतीत ओबीसी आरक्षणाच्या घोळामुळे 13 जागांवर मतदान 22 डिसेंबरला पार पडलं तर उर्वरीत 4 जागांसाठी काल मतदान झालं.गेल्या वेळी 13 जागांपैकी भाजपच्या एका उमेदवाराकडून ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने एक जागा बिनविरोध झाली होती तर भाजपच्या दुसऱ्या एका उमेदवाराने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने 11 जागेसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती.