Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सदावर्ते यांना पाठींबा देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना आले मेसेज

gunratna sadavarte
, शनिवार, 9 एप्रिल 2022 (15:19 IST)
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर हल्ला करण्यासाठी एसटी आंदोलकांना चिथावणी दिल्याप्रकरणी वकील गुणवंत सदावर्ते यांना पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळले असून किल्ला कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे. यादरम्यान सदावर्ते यांना पाठींबा देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना मेसेज पाठवले जात असल्याचे समोर आले आहे.
 
हे मेसेज सदावर्ते यांची पत्नी व वकील जयश्री पाटील यांच्या नावाने फॉरवर्ड केले जात आहेत. या मेसेजमध्ये आंदोलक कर्मचाऱ्यांनी मुंबई सोडून जाऊ नये. पाच हजार कर्मचारी मुंबईकडे निघाले असून सगळ्यांनी कोर्टाबाहेर जमावे. साहेबांवर लावण्यात आलेली कलम साधारण आहेत. आपल्या बापाला काहीही होऊ देणार नाही असा इशारा यात देण्यात आला असून कठीणकाळात साहेबांना साथ द्या अशा आशयाचे  मेसेज आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कायदा हातात घेतल्यास राज्य सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही