Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फक्त मराठी माणूस केंद्रीय तपास यंत्रणांच्या आणि त्यातही ईडीच्या रडारवर

nitin deshmukh
, शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (15:00 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने कारवाई केली. तर शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख, राजन साळवी, वैभव नाईक यांना एसीबीने नोटीस बजावली. यातच आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुजरातला गेलेले मात्र, नंतर ठाकरे गटात परतलेले आमदार नितीन देशमुख यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. फक्त मराठी माणूस केंद्रीय तपास यंत्रणांच्या आणि त्यातही ईडीच्या रडारवर आहे. यामागे भाजप नेते किरीट सोमय्या, मोहित कंबोज आणि भाजप समर्थक अपक्ष आमदार रवी राणा यांचे कारस्थान आहे, असा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे.
 
सुरत येथून माघारी परतण्याच्या प्रसंगावर नितीन देशमुख यावेळी बोलले. मी तेव्हा नागपुरात कसा पोहोचला हे मलाच माहीत आहे. तेव्हा सुरतला मला हृदयविकाराचा झटका आल्याचे कुणी म्हणाले, तर कुणी माझ्या घातपाताच्या अफवा पसरवल्या, असे नमूद करताना हृदयविकाराचा झटका आला असेल तर मी तीन दिवसांत नागपुरात कसा पोहोचेन, असा सवाल करत नितीन देशमुख नशेत धुंद होते, अशा बातम्या गुजरातमधील वर्तमानपत्रात छापून आणल्या गेल्या, पण त्यात काहीही तथ्य नाही. माझी डीएनए तपासणी करा. त्यात जर नशा करत असल्याचे आढळले तर राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान देशमुख यांनी दिले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उदित नारायण, कुमार सानू, रणवीर शोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार प्रदान