Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोना संसर्ग सीमा ओलांडू शकणार नाही असं काही नाही, डॉ. साळुंखे यांचा गंभीर इशारा

कोरोना संसर्ग सीमा ओलांडू शकणार नाही असं काही नाही, डॉ. साळुंखे यांचा गंभीर इशारा
, मंगळवार, 9 मार्च 2021 (16:00 IST)
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले तर संसर्ग फक्त राज्यापुरता मर्यादित राहणार नाही असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. “महाराष्ट्राने आपल्या सीमा बंद केल्या आहेत आणि कोरोना संसर्ग सीमा ओलांडू शकणार नाही असं काही नाही,” असा इशारा राज्याचे कोरोना संबंधीचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी बोलताना दिला आहे.
 
“जर सरकारने योग्य काळजी घेतली नाही आणि लोकांनी सरकारने आखून दिलेल्या नियमांचं पालन केलं नाही तर कोरोना इतर राज्यांमध्ये फैलावेल तो दिवस दूर नाही,” अशा शब्दांत डॉक्टर साळुंखे यांनी गंभीरता सांगितली आहे.
 
सुभाष साळुंखे यांनी यावेळी दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल महाराष्ट्राकडून मिळणाऱ्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं सांगितलं. “करोना व्हायरस फक्त महाराष्ट्रातच राहणार असा विचार करु नका, कोरोनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी पावलं उचचली गेली नाही तर एप्रिल महिन्यात उत्तर आणि ईशान्य भारतात महाराष्ट्रासारखी परिस्थिती असेल,” असंही ते म्हणाले आहेत.
 
महाराष्ट्रातील सध्याच्या स्थितीवर बोलताना ते म्हणाले की, ही वाढ अचानक झालेली नसून करोनाच्या संक्रमणासाठी अनेक घटक जबाबदार आहेत. “सध्याच्या घडीला व्हायरसचं उत्परिवर्तन इतकं झालेलं नाही की, कोरोना रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीसाठी त्याला दोष दिला जाऊ शकतो. करोना रुग्णसंख्या वाढ होण्यामागे इतर गोष्टीदेखील कारणीभूत आहेत”.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोन्याचे दागिने खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या 24K गोल्ड आणि 22K गोल्ड मधील फरक