Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकदाचा होऊन जाऊ दे राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले हे खुले आव्हान

uddhav and raj thackeray
, बुधवार, 4 मे 2022 (08:07 IST)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३मेच्या अल्मिमेटम संपत आल्याने आता अतिशय आक्रमक धोरण स्विकारले आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी मनसैनिकांना आदेश दिले आहेत की उद्यापासून राज्यात जिथे जिथे मशिदीवर भोंगे सुरू असतील तिथे दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावा. तसेच, यासंदर्भात पोलिसांनाही दररोज तक्रार देण्याचे सूचित केले आहे. विशेष म्हणजे, राज यांनी त्यांचे बंधू आणि मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी एकदाचा होऊन जाऊ दे अशीच भाषा वापरली आहे. त्यामुळे आता राज आणि उद्धव यांचा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 
राज यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो ती, कै. हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात, याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल. हे सुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे.माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारुन एकत्र याआता नाही तर कधीच नाहीआपलाराज ठाकरे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोसायटी/अपार्टमेंटमधील पार्किंगवरुन भांडण होताय? आधी हे वाचा