Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाची झडप, 5 मृत्यूमुखी

देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाची झडप, 5 मृत्यूमुखी
, शुक्रवार, 11 मार्च 2022 (20:59 IST)
अक्कलकोट गाणगापूर रोडवर बळोरगी जवळ कारचा भीषण अपघात होऊन अपघातात 4 महिला आणि 1 पुरुष जागीच ठार झाले आहे. हे भाविक अहमदनगरहून गाणगापूर दर्शनासाठी गेले होते. हे भाविक देवदर्शनातून परत येताना वाहन चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या अपघातात गाडी अनियंत्रित होऊन झाडावर आदळली. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले. या अपघातात मयत लोकांचे मृतदेह कर्नाटकातील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.

घटनास्थळी अफझलपूरपोलीस पोहोचली असून कारमधील रक्ताने माखलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. हे प्रवाशी ज्या कारमध्ये होते त्या  गाडीवर 'L' असे चिन्ह अंकित होते. गाडी अनियंत्रित होऊन झाडाला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात पाची जणांचे मृतदेह गाडीत अडकून पडले होते. अफजलपूर पोलीस अपघाताचा तपास करत आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारताचे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हद्दीत पडलं, भारतानं म्हटलं तांत्रिक बिघाडामुळे झालं