Publish Date: Wed, 22 Mar 2023 (14:22 IST)
Updated Date: Wed, 22 Mar 2023 (14:39 IST)
मनसेचे प्रमुख राजठाकरे यांची आज दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात गुढी पाडव्यानिमित्त सभा आहे. या मेळाव्यासाठी मनसेचे हजारो समर्थक येण्याची शक्यता असल्यामुळे दादर परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून पोलीस बंदोबस्त चोख राहणार आहे. या मेळाव्यासाठी रस्त्यावरील वाहतूक वळविण्यात आली असून मुंबईत शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.सेनापती बापट रोड, माहीम आणि दादर.कामगर स्टेडियम सेनापती बापट रोड, इंडिया बुल फायनान्स सेंटर पीपीएल पार्किंग एल्फिन्स्टन, मुंबई., कोहिनूर पीपीएल पार्किंग. शिवाजी पार्क, मुंबई, आप्पासाहेब मराठे रोड,पाच उद्यानांचा परिघ, माटुंगा, रेती बंदर (माहीम), आरएके रोड.अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था मध्ये केला जाणारा बदल 22 मार्च रोजी दुपारी 2 ते रात्री 12 वाजे पर्यंतच्या कालावधीत राहील.