Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुकाराम मुंढे बदली राज्यात चर्चेचा विषय दत्तक नाशिकला पुन्हा डावलले

तुकाराम मुंढे बदली राज्यात चर्चेचा विषय दत्तक नाशिकला पुन्हा डावलले
, शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018 (17:04 IST)
सध्या राज्यात सनधी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली फार गाजत आहे. प्रामाणिक आणि नियमांवर बोट ठेवणारा अधिकारी अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांची ही ११ वी बदली असून, भाजप लोकप्रतिनिधींनी त्यांना जोरदार विरोध केला मात्र नाशिकच्या नागरिकांनी त्यांना जोरदार समर्थन दिले होते. मुंढे ही विषय पूर्ण राज्यात सध्या चर्चेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला दत्तक घेत येथे तुकाराम मुंढे यांची बदली केली होती, मुंढे यांनी जोरदार काम करत नागरिकांची मने जिंकली होती, मात्र फक्त ९ महिन्यात त्यांची बदली झाली. यामुळे नाशिकचे नाकारिक संतापले आहेत.
 
त्यात गुरुवारी (दि. 22) तुकाराम मुंढे यांना नाशिक मनपा आयुक्त पदावरून मंत्रालयात नियोजन विभागाच्या सहसचिव पदी बदलीचे आदेश प्राप्त झाल्यानंतर नाशिकच्या महापौर रंजना भानसी यांच्या शासकीय निवासस्थान रामायण बंगल्यासमोर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली होती. त्यावरून संपूर्ण शहरातील विविध स्तरावरून नाराजीचा सूर उमटून अनेकांनी संतापही व्यक्त केला होता. त्याला अनुसरून याबाबत माध्येमे यातील बातम्यांचा  आधार घेत आम्ही नाशिककर या संस्थेने नाशिक महापौर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर दिवसा फटके फोडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर समाधान भारतीय, अनिल भडांगे, विनायक येवले, योगेश कापसे, दत्तू बोडके आदींच्या सह्या आहेत.सरकारवाडा पोलिसांनी येत्या तासाभरात दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करू असे आश्वस दिल्याचा दावा आम्ही नाशिककरने केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उपसमिती आता स्थापन करणार तर पाच दिवसांत मराठा आरक्षण कसे देणार? - धनंजय मुंढे