Publish Date: Fri, 07 Jun 2019 (16:55 IST)
Updated Date: Fri, 07 Jun 2019 (16:58 IST)
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे १६ जून रोजी अयोध्येत जाणार आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे खासदारही असणार आहेत. अयोध्येतील रामलल्ला मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेणार आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार हे आधीच ठरलं होतं. मात्र त्या दौऱ्याची तारीख समोर आली नव्हती. आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. १६ जून रोजी ते अयोध्येत जातील आणि राम मंदिर निर्मितीचा आढावा घेतील असेही समजते आहे.
याआधी २०१८ च्या नोव्हेंबर महिन्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब अयोध्येत भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी रामलल्लाचेही दर्शन घेतले होते.