Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Live Suicide : प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन केली प्रियकराने आत्महत्या

Live Suicide : प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन केली प्रियकराने आत्महत्या
, मंगळवार, 20 जून 2017 (11:16 IST)

उल्हासनगरमध्ये प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन प्रियकराने आत्महत्या केली आहे. हनी आसवानी असं या मृत प्रियकराचं नाव आहे. हनी आसवानीचे नालासोपाऱ्यात राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. सात वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर त्यांचं ब्रेकअप झालं.  प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत लग्नाची तयारी केली होती. 21 मे रोजी हनी आणि तरुणीची मुंबईतील एका हॉटेलमध्ये शेवटची भेट झाली होती. यावेळी लग्नाच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये वादही झाले. यानंतर चिडून घरी आलेल्या हनीने प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करुन आत्महत्येची धमकी दिली. त्यावर तिने आत्महत्या करुन दाखव, असं आव्हान दिल्याने हनीने व्हिडीओ कॉल दरम्यानच आत्महत्या केली.तब्बल 20 दिवसांनंतर हा संपूर्ण प्रकार हनीचे वडील नरेश आसवानी यांना समजला. त्यानंतर त्यांनी हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये 18 जून रोजी हनीच्या प्रेयसीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्होडाफोन सुपरनाईट प्लान, 29 रुपयात ५ तास अनलिमिटेड डेटा