वंदे भारत एक्स्प्रेस ही सुपरफास्ट ट्रेन आहे. ही ट्रेन नेहमीच कोणत्या न कोणत्या चर्चेत असते. आता ही ट्रेन सिगारेटमुळे चर्चेत आली आहे. धूम्रपान करणे जरी धोकादायक असले तरीही अनेकांना सिगारेटचे व्यसन आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात सिगारेट ओढणारे हे दिसून येतात. आता या सिगारेटमुळे वेगवान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गोंधळ झाला आणि ही वेगवान धावणारी ट्रेन थांबली.
छत्रपती संभाजी नगरहून मुंबई कडे जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन मध्ये एका प्रवाशाला सिगारेटची तलफ आली आणि त्याने बाथरूम मध्ये जाऊन चक्क सिगारेट ओढायला सुरुवात केली. डब्यात धूर झाला आणि गाडीच्या डब्यात अचानक अलार्म वाजायला सुरु झाले. आग लागल्याच्या भीतीमुळे बोगीत प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला आणि नंतर गाडी थांबली. मात्र हा धूर सिगारेटचा असल्याचे समजले.
सदर घटना 9 जानेवारी रोजी नाशिक रेल्वे स्थानकाच्या काहीच अंतरावर घडली आहे. ही ट्रेन नाशिक रेल्वे स्थानकात काहीच अंतरावर होती की अचानक C-5 या कोच मधून अलार्म वाजत होता. काहीच अंतरावर ट्रेन थांबली आणि रेल्वेचे सुरक्षा बाळाचे जवान देखील धावत आले. धूर कुठून आला हे कळले नाही तेव्हा सीसीटीव्ही पाहून एका प्रवाशाने बाथरूम मध्ये सिगारेट ओढल्याचे समजले. या प्रवाशाला नाशिक रेल्वे स्थानकावर उतरवले आणि ट्रेन मध्ये सिगारेट ओढल्याबद्दल ताब्यात घेतले. नंतर ही ट्रेन सोडण्यात आली. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.