Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

लातुरातील राज्य सभा उमेदवार आम्हीच ठरवू - रावसाहेब दानवे

Rajya Sabha candidate
, सोमवार, 26 नोव्हेंबर 2018 (08:36 IST)
भाजपाकडून राज्यातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघ आणि विधानसभेच्या २८८ मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. विधानसभा असो की लोकसभा त्याच्या उमेदवार निवडीची एक प्रक्रिया भाजपात आहे. त्यानुसारच लातूर लोकसभेचा उमेदवार निवडला जाईल. हा संपूर्ण अधिकार पक्षाचा आहे अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी लातुरच्या पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर दिली.
 
दानवे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी आज लातुरात आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या पदाधिकार्‍यांचीही बैठक आयोजित करण्यात आली होती. उअजनीचं पाणी, सरकारच्या उपाययोजना, दुष्काळावर मात करण्यासाठी केले जाणारे प्रयत्न अशा विविध विषयांवर दानवे यांनी सरकारची बाजू मांडली. उजनीचे मराठवाड्याच्या हक्काचे पाणी देणारच आहोत असे त्यांनी निर्धारपूर्वक सांगितले. सगळ्या मतदारस्म्घांचा आढावा ०४ टप्प्यात डिसेंबर महिन्यात पूर्ण होईल, मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकार आग्रही असून ते लवकरच दिले जाईल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात भाजपाचीच सरशी होईल असा ठाम विश्वास त्यांनी केला. यावेळी लातूरचे खासदार सुनील गायकवाड, लातुरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार गोविंद केंद्रे, शैलेश लाहोटी, नागनाथ निडवदे उपस्थित होते. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राम मंदिर प्रश्नासाठी न्यायालयावर अवलंबून राहू नका - सर संघचालक