Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Weather Forecast : राज्यात येत्या दोन दिवसात पावसाचा अलर्ट

Weather Forecast : राज्यात येत्या दोन दिवसात पावसाचा अलर्ट
, रविवार, 26 डिसेंबर 2021 (10:44 IST)
भारतीय हवामान खात्याने राज्यात 27 डिसेंबर ते 29 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला आहे. रविवार (26 डिसेंबर) पासून महाराष्ट्रावर आणि 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD)प्रभाव पडण्याची दाट शक्यता आहे. 28-29 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
 
राज्यात कुठं पाऊस पडणार
हवामान खात्याने 28 आणि 29 डिसेंबरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. 28 डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, जळगाव, परभणी, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.27  डिसेंबर रोजी विर्दभात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक! पाच महिन्यांच्या चिमुकल्याची अज्ञाताकडून निर्घृण हत्या