अरे आम्ही बील भरतो, मी दहा लाख रुपये बील भरलं आहे औरंगाबादचं. तुमच्यात हिंमत आहे तर झोपडपट्टीत जा, जे आकडे टाकतात त्यांच्याकडे जा, आम्ही पैसे भरतो. मी या वर्षात दोन मीटरचे दहा लाख भरले आहेत,एका मिनिटात मी तुला घरी पाठवेन, माज चढला का, आम्ही पैसे भरतो, मी तुम्हाला सस्पेंड करु शकतो, तुम्हाला नीट करु शकतो, उर्जामंत्रीसुद्धा माझ्या जवळचे नातवाईक आहेत, उद्या एक कम्पेंट टाकली ना नोकरी जाईल.
तुमच्या लोकांनी काढून नेलं आहे माझं मीटर, आयकर विभागाच्या धाडी टाकेन, काय प्रॉपर्टी घेतली, कुठे कुठे पैसे घेतले, आम्ही कुंडल्या ठेवल्यात तुमच्या आमच्या नादी लागू नका. असं संभाषण या कथित ऑडिओ क्लिपमध्या आहे.
बबनराव लोणीकर यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, हा मला बदनाम करण्याचा कट असून माझी व्हायरल झालेली ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा परतुरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय, माझं मीटर शाबूत आहे कुणीही कापले नाही, हा मला बदनाम करण्याचा कट असल्याचं लोणीकर यांचं म्हणणं आहे