केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार 80 कोटी लोकांना गहू 2 रुपये किलो तर तांदूळ 3 रुपये किलोने देणार. तसेच सरकारी संस्थांमध्ये जे कंत्राटी कामगार आहेत त्यांनाही पगार दिला जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी हा लॉकडाउन आवश्यक होता असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी असे म्हटत करोनाशी लढण्यासाठी चार उपाय सांगितले आहेत- घरात थांबा, हात धुवा, ताप, सर्दी, खोकला असल्यास डॉक्टरांकडे जा आणि सोशल डिस्टसिंग हे महत्तवाचे असल्याचे सांगितले.
या दरम्यान 80 कोटी लोकांना 27 रुपये किलोचा गहू 2 रुपये किलोने देणार तर 37 रुपये किलोचा तांदूळ 3 रुपये किलोने देणार.
या व्यतिरिक्त आवश्यक सेवांची दुकानं बंद होणार नाहीत, असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं.