सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सगळी कडे वाढत आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला पाहता आणि लहान मुलांची काळजी घेता राज्यातील शाळा 15 फेब्रुवारी पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने राज्यातील शाळा बंद करण्याच्या निर्णयावर अनेकांनी विरोध केला आहे. या वर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महत्तवाची माहिती दिली. टोपे म्हणाले की, राज्यात 15 दिवसांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यावर काही राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेतील.
सध्या 15 ते 18 वयोगटाच्या मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. आता पर्यंत 42 टक्के मुलांना लसीकरण देण्यात आले आहे. सध्या 90 टक्के लोकांना लसीकरण केले आहे. ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही. त्यांना लसीकरणासाठी प्रवृत्त केले जाणार असल्याचे आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.