Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 1 May 2025
webdunia

कुठे गेलं मुंबईवरचं प्रेम?, नितेश राणे यांचे ट्वीट

love for Mumbai go ?
, सोमवार, 19 जुलै 2021 (22:49 IST)
मुंबईतल्या पावसावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत  मुंबईवर संकट ओढावलं असताना सेलिब्रिटी कुठे आहेत?, असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
 
“मुंबईत मुसळधार पाऊस असताना एकाही सेलिब्रिटीने परिस्थितीवर पोस्ट किंवा ट्वीट केलेलं नाही, हे कसं काय?, का फक्त पैशांसाठी त्यांच्या डायलॉगप्रमाणे सर्व पोस्ट स्क्रिप्टसारख्या लिहिलेल्या असतात. कुठे गेलं मुंबईवरचं प्रेम?” असं ट्वीट आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
 
दुसरीकडे  भाजपा आमदार प्रसाद लाड यांनीही ट्विटरवरुन एका जुन्या बातमीच्या आधारे शिवसेनेला टोला लगावला आहे. प्रसाद लाड यांनी, “ये मुंबई है… ये सब जानती है…” असं म्हणत सामना या वेबसाईटच्या २०१७ च्या बातमीचा स्क्रीनशॉर्ट शेअर केला आहे. या स्क्रीनशॉर्टमध्ये सध्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी २०१७ मध्ये मुंबईमध्ये पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं तेव्हा मुख्यमंत्री जबाबदार असल्याचं म्हटलं होतं, असं वृत्त दिसत आहे. “२०१७ मध्ये मुख्यमंत्री जबाबदार… आणि २०२१ मध्ये पाऊस जबाबदार… ऐसा कैसे चलेगा…”, असं ट्विट केलं आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात वार्षिक यात्रेसाठी परवानगी नाही : कोर्ट