कोल्हापूरच्या अर्जुनवाडा मुगळी तालुका कागल येथे एक धक्कादायक घटना घटली आहे. येथे एका 19 वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणीने शिक्षकाचा त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आकांक्षा तानाजी सातवेकर असे या मयत तरुणीचे नाव आहे.कोल्हापूर मुरगूड पोलिसांनी आरोपी शिक्षक अमित भीमराव कुंभारला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्या गावातीलआरोपी शिक्षक गेल्या दीड महिन्यापासून सोशल मीडियावरून या तरुणीशी लग्न करण्यासाठी तील त्रास देत होता. आरोपी हा विवाहित असून त्याला मूलबाळ देखील आहे. हा शिक्षक या तरुणीला सतत फोन करायचा आणि मेसेज करायचा. 'तू माझ्याशी लग्न करण्यास होकार दिल्यास मी बायको मुलांना सोडेन' असं म्हणायचा. या शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून या महाविद्यालयीन तरुणीने विष प्राशन करून आपले आयुष्य संपविले. तिने 22 जानेवारी रोजी आपल्या राहत्या घरात विष प्राशन करून आत्महत्या केली.
घरातील सदस्यांना हे समजतातच तिला तातडीने कोल्हापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तिचा जबाब नोंदविला त्यात तिने मी अमित कुंभार या शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केले असं सांगितले. तिचा काल उपचारादरम्यान मृत्य झाला आहे. तिला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या गुन्हासाठी शिक्षक अमित कुंभार याला पोलिसांनी अटक केली आहे .