Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यूट्युबवर व्हिडीओच्या व्यसनातून तरूणीची आत्महत्या

यूट्युबवर व्हिडीओच्या व्यसनातून तरूणीची आत्महत्या
, बुधवार, 16 जानेवारी 2019 (17:24 IST)
मुंबईत एका १५ वर्षीय तरुणीला व्हिडिओ काढून ‘टिक टॉक अॅप’वर टाकण्यास आजीने विरोध केल्याने त्या तरुणीने आत्महत्या केल्याची चर्चा सुरु असतांना या तरुणीला ‘टिक टॉक’चे व्यसन नसून यूट्युबवर व्हिडीओ पाहण्याचं व्यसन लागले असल्याची माहिती समोर आली आहे. थेट स्वर्गात कसे जाता येईल याचा ध्यास या मुलीला लागला होता. 
 
श्रावणी घोलप (१५) असे तरूणीचे नाव आहे.  या मुलीला युट्युबवर व्हिडिओ पाहण्याचं व्यसन लागले होते. थेट स्वर्गात कस जाता येईल, याचे व्हिडिओ ती सातत्याने यूट्यूबवर पाहायची आणि त्यातूनच तिने एक अघोरी प्रयोग केला आणि त्यात तरुणीचा मृत्यू झाला. तुमच्या आत्म्याला बाहेर बोलवायचे. तसेच काही काळ त्याच्याशी बोलायचं आणि मग पुन्हा आत्मा शरीरात शिरतो, असलं काहीतरी भलतं सलतं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
 
स्वर्गात जाण्यासाठी श्रावणीने सर्वप्रथम हॉलमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी तिला आजीने विरोध केला. विरोध केल्यानंतर ती रडत बाथरुममध्ये गेली आणि तेथेच तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

एअरटेल वापरकर्त्यांना दररोज 1 जीबी डेटा मिळेल