Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राऊत तोंडघशी पडले, युवसेनाप्रमुख श्रीकांत शिंदेंचा नाशकातून निशाणा

shrikant shinde
, बुधवार, 1 मार्च 2023 (08:15 IST)
Twitter
नाशिक : खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याचा कट रचला असल्याचा खळबळजनक आरोप काल संजय राऊत यांनी केला होता. आपल्याला जीवे मारण्याची सुपारी श्रीकांत शिंदे यांनी दिली असल्याचे उघड उघड आरोप त्यांनी केले होते. त्यावर बोलताना ‘नाशिकमध्ये देखील कायम येणाऱ्या एका नेत्याने बिन बुडाचे आरोप केले होते. मात्र ते तोंडघशी पडले.’ असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे आणि त्यांच्या आरोपांचे उत्तर दिले आहे.
 
सध्या खालच्या पातळीवर टीका होत आहे. कोणीतरी म्हणाले की वर्षावर अडीच कोटी खर्च झाले. वर्षावर सध्या मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. मग काय त्यांना चहा आणि खायला द्यायचे नाही का..? आधी संपूर्ण काम ऑनलाईन चालत असल्याने वर्षावर कोणीच येत नव्हते,’ असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी अजित पवारांना नाव न घेता टोला लगावला आहे.
 
या पूर्वी फक्त ऑनलाईन कार्यक्रम होत होते: श्रीकांत शिंदे
 
‘सरकारच्या योजनांच्या माध्यमाने रोजगाराच्या संधी मिळत आहे. गेली अडीच वर्ष ठप्प झालेली काम देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब करत आहे. ६ महिन्यात ६ वेळा मुख्यमंत्री नाशिकला येऊन गेले..या पूर्वी फक्त ऑनलाईन कार्यक्रम होत होते. आता ऑफलाईन काम होत आहे. लोकांमध्ये जाऊन काम होत आहे. कोविडच्या नावाखाली अडीच वर्षात राज्य मागे निघून गेले. इतर राज्य आपल्या पुढे निघून गेले. म्हणून आत्ता मुख्यमंत्री इतका वेळ काम करत आहे. समृधी महामार्ग जगाला हेवा वाटेल असा प्रकल्प वेळेत पूर्ण केला आहे’ असे म्हणत श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना तोळे लगावले आहे.
 
कांदा उत्पादकांच्या मागे मुख्यमंत्री खंबीर उभे: श्रीकांत शिंदे
 
‘मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये कांद्याच्या बाबत सकारात्मक भूमिका घेतली आणि सर्व कांदा उत्पादकांच्या मागे मुख्यमंत्री खंबीर उभे आहेत. कांदा उत्पादकांच्या मागे राहून त्यांच्या समस्या सोडविण्यात येईल. दादा भुसे हे आंदोलकांशी बोलले आहे आणि कांदा उत्पादक जर भेटले तर त्यांच्याशी चर्चा करणार’ असेही यावेळी श्रीकांत शिंदे यांनी म्हंटले आहे.
 
राजकारणाचा स्तर खालावला आहे
 
‘राजकारणाचा स्तर खालावला आहे. कशा प्रकारच्या टीका करायच्या हे देखील समजलं पाहिजे. वर्षा या निवासस्थानी जो खर्च झाला आहे तो आमच्या परिवाराचा खर्च नाहीये. महाराष्ट्रातील जे नागरिक मुख्यमंत्री यांना भेटण्यासाठी येतात त्यांना चहा पाण्यावर खर्च होतो. डेव्हलपमेंटचं राजकारण केलं पाहिजे. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री च्या पद्धतीने काम करता ते बघून विरोधकांचे पाय घसरत चालले आहे’ अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आशिष शेलारांनी ट्वीट करताना घेतली होती का, अरविंद सावंतांचा खोचक सवाल