Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Dating Advice : डेटिंग ला जाण्याचा तणाव कमी करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

dating tips for first date
, रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (11:32 IST)
Dating Advice : आजकाल डेटिंग ही एक सामान्य गोष्ट आहे. लोक सहसा मजा करण्यासाठी डेट करतात. पण अनेकजण कमिटेड रिलेशनशिपमध्ये येण्यापूर्वी एखाद्याला ओळखण्यासाठी याचा अवलंब करतात. खरं तर, एखाद्या व्यक्तीला ओळखण्याचा डेटिंग हा एक चांगला मार्ग आहे. डेटिंगदरम्यान समोरच्या व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी स्पष्ट होतात. तथापि, डेटिंग लोकांना वाटते तितके सोपे नाही. अनेक लोक डेटिंगच्या नावाने घाबरतात. यामागे अनेक कारणे असू शकतात.डेटिंगला जाण्याचा तणाव काहीलोक घेतात. डेटिंगवर जाऊन काय होईल. भेटीचा परिणाम सकारात्मक होईल का? असे विचार मनात येतात आणि ताण होतो. ताण दूर करण्यासाठी या काही टिप्स अवलंबवा.
 
नकारात्मक विचारांपासून दूर राहा-
डेटिंगला घेऊन मनात येणारे नकारात्मक विचारांना दूर करा. डेटिंगवर काही चूक झाली तर अशी भावना मनातून काढून टाका. मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांना दूर करा. आपले मूड चांगले ठेवा आणि डेटवर जा. सर्व काही चांगले होईल असा सकारात्मक विचार करून डेटिंग वर जा. 
 
स्वतःशी दयाळूपणे वागणे महत्वाचे आहे - 
काळजी करणे म्हणजे  स्वतःबद्दल शंका निर्माण करणे आहे. म्हणून स्वतःवर  विश्वास दाखवा. तुम्ही जसे आहात तसेच राहा. नकारात्मक विचार तुमच्या मनावर वर्चस्व गाजवू लागले की, तुमच्या चांगल्या गुणांची आठवण करून घ्या. इतर कोणाला नाही, परंतु जी व्यक्ती तुम्हाला भेटायला आली आहे किंवा जो जोडीदार असेल त्याला तुम्ही तसेच आवडाल. त्यामुळे काळजी करण्याची मुळीच गरज नाही.
 



Edited by - Priya Dixit    
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Career in Master of Surgery Obstetrics and Gynaecology :मास्टर ऑफ सर्जरी ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॅकॉलॉजी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या