Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Wedding Wishes in Marathi लग्नाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश

Wedding Wishes in Marathi लग्नाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश
, सोमवार, 2 डिसेंबर 2024 (16:49 IST)
नाती जन्मोजन्मींची
परमेश्वराने ठरवलेली
दोन जीवांना प्रेमभरल्या 
रेशीमगाठीत बांधलेली
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
लग्न म्हणजे एक पवित्र बंधन
दोन नात्याची जन्मोजन्मींची गुंफण… 
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा
 
हे बंध रेशमाचे
एका नात्यात गुंफलेले
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: Marriage Wishes In Marathi लग्नाच्या शुभेच्छा मराठी संदेश
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन
सनईचौघड्याच्या सुरात नवजीवनात केलेले पदार्पण
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा
 
विश्वासाचे हे बंधन कायम असेच राहो, 
तुमच्या जीवनाचा आनंद सागर नेहमीच उधाणलेला राहो
तुमच्या सहजीवनात सुख समृद्धी नांदो
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा
ALSO READ: Wedding Anniversary Wishes In Marathi लग्नवाढदिवसाच्या खास शुभेच्छा
जग तुमचे सोनेरी किरणांनी उजळून निघू दे
घराचे आंगण नेहमीच आनंदाने फुलू दे…
लग्नासाठी हार्दिक शुभेच्छा
 
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटू दे
यश तुम्हाला भरभरून मिळू दे
लग्नासाठी मनपूर्वक शुभेच्छा
 
हळदीचा वास आणि मेंदीचा रंग
खुलवेल तुमच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग 
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुमच्या सहजीवनाला सुखाची पालवी फुटू दे
तुमच्या संसाराच्या वेलीवर सुख समाधान नांदू दे
वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा
 
लग्न म्हणजे रेशीम गाठ
अक्षता आणि मंगलाष्टका सात
दोनाचे होणार आता चार हात
दोन जीव गुंतणार एकमेकांत
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Dinner Special : पंजाबी छोले रेसिपी