व्याजदर: अर्थशास्त्रातील तज्ज्ञ डि. के. जोशी यांच्या अंदाजानुसार सन 2009 मध्ये चलनवाढीचा दर मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. त्याचप्रमाणे व्याजदरही कमी होतील. रिझर्व्ह बँकेने नुकताच रेपो दर आणि व्याजदरात बदल केला आहे. यामुळेच नवीन वर्षाच्या पहिल्या तिमाहीत व्याजदर आणखी दोन टक्यांनी कमी होतील. पर्यायाने गृहकर्ज, व्यक्तीगत कर्ज, शैक्षणिक कर्ज, कार लोन यांचे व्याजदर कमी होतील. देशाची अर्थव्यवस्था सन 2009 च्या शेवटी किंवा सन 2010 च्या पहिल्या तिमाहीत पुन्हा गती घेईल.
रुपया मजबूत होईल: डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत होईल. शॉर्ट टर्म डिपॉझिटमध्ये वाढ होईल.