Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Pithori Amavasya 2019 पिठोरी अमावस्या व्रत पूजा विधी

Webdunia
पिठोरी अमावस्या विवाहित स्त्रिया आपल्या मुलांसाठी ठेवतात. देशातील अनेक राज्यांमध्ये याला पोळा अमावस्या म्हणून देखील साजरी करतात. पिठोरी अमावस्या व्रताचं महत्त्व आणि त्याबद्दल माहिती सर्वात आधी देवी पार्वती यांनी सांगितले होती. त्यांनी स्वर्गलोकाचेे देव राजा इंद्र यांच्या पत्नीला याबद्दल माहिती दिली होती. देवी पार्वतीने सांगितले होते की हे व्रत केल्याने मुलांच्या जीवनात सुख-समृद्धी राहते. त्यांना शौर्य प्राप्त होतं.
 
पूजा विधी
या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आहे. असे शक्य नसल्यास पवित्र नदीचं पाणी आपल्या अंघोळीच्या पाण्यात मिसळून स्नान करावे. नंतर सूर्याला अर्घ्य द्यावे. दररोज प्रमाणे देवाची पूजा करावी.
अमावस्या तिथी पितरांची तिथी देखील मानली जाते म्हणून या दिवशी पिंड दान व तरपण करण्याचे देखील महत्त्व आहे.
या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना चपला, छत्री, शॉल व इतर वस्तू दान करावे.
शक्य असल्यास पुरी भाजी, शिरा तयार करून गरिबांना आणि विशेष करून लहान मुलांना खाऊ घालावा.
या दिवशी 64 देवींची पूजा आराधना केली जाते. या दिवशी आपल्या कुटुंबाची आणि मुलांच्या समृद्धीची प्रार्थना केली जाते. त्यांना दीर्घायू प्राप्त हो अशी प्रार्थना करावी.
या दिवशी क‍णकेने देवी प्रतिमा तयार करून पूजा करावी. आपल्या आवडीप्रमाणे त्यांना रंग देणे, सजवणे, वस्त्र परिधान करवणे हे देखील करता येऊ शकतं.
काही क्षेत्रांमध्ये देवी दुर्गेला योगिनी रूपात पुजतात. म्हणून प्रत्येक देवी अर्थात 64 योगिनींची पूजा केली जाते. या सर्व मुरत्या एका चौरंगावर किंवा पाटावर मांडाव्या.
त्यांना दागिने घालायचे असल्यास बेसनच्या पिठाचे दागिने तयार करावे. सवाष्णीचे सर्व दागिने तयार करून देवीला सजवावे.
अलीकडे त्यांची छापील चित्रे मिळतात.
पूर्ण विधिपूर्वक पूजा झाल्यावर आरती करावी. देवीला नैवेद्य दाखवावा.
व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ करावे. बेदाणे घातलेली भाताची खीर हा ‘पिठोरी’चा खास नैवेद्य.
खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आईने ते डोक्यावर घेऊन ‘अतिथी कोण? असा प्रश्न विचारावा. मुलांनी ‘मी आहे’ असे म्हणून ते पक्वान्न मागच्या बाजूने काढून घ्यावे.
या दिवशी सप्तमातृका पूजा देखील केली जाते. शिव आणि शक्ती यांच्याद्वारे उत्पन्न 7 दिव्य माता ज्यांचे नावे ब्राह्मणी, वैष्णवी, महेश्वरी, कुमारी, वाराही, इंद्राणी, चामुंडी असे आहेत त्यांची पूजा केली जाते. नंतर शिवाद्वारे शक्ती योगेश्वरी उत्पन्न झाली. या देवीला आठवे स्थान प्राप्त झाले. म्हणून पिठोरी अमावास्येला 64 योगिनी आणि सप्तमातृकेची पूजा केली जाते.
 
पिठोरी अमावस्या व्रत केल्याने मुलं स्वस्थ, बुद्धिमान आणि शौर्यवान बनतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

बुधवारचा दिवस गणेशाला का समर्पित केला जातो, जाणून घ्या

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

मंगळवार : वारांचे उपवास आणि व्रत कैवल्य

Utpatti Ekadashi 2024: उत्पत्ति एकादशीला 3 प्रभावी उपाय करा, धन संकटपासून मुक्त व्हा !

आरती मंगळवारची

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

पुढील लेख
Show comments