Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सिंहासन बत्तिशीची कथा क्रं.20 (कमळ चिन्ह)

सिंहासन बत्तिशीची कथा क्रं.20 (कमळ चिन्ह)

वेबदुनिया

WD
राजा विक्रमादित्य फार ज्ञानी होता. तसेच तो ज्ञानी व्यक्तीची कदर करणाराही होता. एक दिवशी राजा विचारात असताना दोन नागरिकांच्या गोष्टी त्याच्या कानी पडल्या. त्यातील एक ज्योतिष होता. त्याने कपाळाला चंदनाचा टीळा लावला होता. काही क्षणातच तो अदृश्य झाला. ज्योतिषीने त्याच्या मित्राला सांगितले होते की, त्यांने ज्योतिषचे संपूर्ण ज्ञान आत्मसात केले असून तो त्याचे भूत, वर्तमान व भविष्यासंदर्भात सर्व काही सांगू शकतो.

मात्र, मित्राचा त्याच्यावर विश्वास नव्हता. तितक्यात ज्योतिषचे जमीनवर पडलेल्या पद चिन्हांवर पडले. त्याने मित्राला सांगितले की, हे एका राजाचे पदचिन्ह आहेत. ज्योतिषच्या मते राजाच्या पावलांचे ठसे हे कमळासारखे असतात. तसे त्याला स्पष्‍ट जाणवत होते.

त्याच्या मित्राने त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले. पद चिन्हांचे ठसे पाहून ते जंगलाच्या दिशेने जाऊ लागतात. जेथे ते ठसे संपतात तेथे एक लाकुड तोड्या लाकूड कापताना दिसतो. ज्योतिषीने त्याला त्याचे पाय दाखविण्यास सांगितले. लाकुड तोड्याने त्याचे पाय ज्योत‍िषीला लागविले. त्याचे पावले ही कमळ पुष्पासारखे होते. ज्योतिषीने त्याला त्याच्या विषयी‍ विचारले असता. तो लहान पणापासूनच लाकुड तोडण्‍याचे काम करीत असल्याचे त्याने सांगितले. तेव्हा ज्योतिषी म्हणाला, हा नक्की राजकुळातील आहे परंतु याला परिस्थितीनुसार लाकुड तोड्ण्याचे काम करीत आहे.

त्याचा मित्र मात्र त्याची टिंगल उडवत होता. त्यानंतर ते राजा विक्रमादित्यचे पाय बघालयला निघाले. जर राजाचे पाय कमळासारखे नसतील ती ही ज्योतिषविद्या सोडून देण्‍याचे त्याने ठरविले. राजवाड्यात पोहचून त्यांनी राजाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राजा भेटून त्यांनी राजाला पाय दाखविण्‍यासाठी प्रार्थना केली. विक्रम राजाचे पाय पाहून ज्योतिषी सुन्न झाला. राजाचे पाय तर साधारण नागरिकाचे पायासारखे होते. कोणत्याच प्रकारचे कमळ चिन्ह नव्हते. ज्योतिषीला आपल्या ज्योतिषशास्रावर संशय आला. त्याने राजाला सर्व हकिकत सांगितली.

राजा हसला. ज्योतिषला म्हणला, तुला तुझ्या ज्ञानावर विश्वास राहिला आहे का? त्यानी 'नाही' असे उत्तर दिले. त्यानंतर ते जाऊ लागले. राजाने त्यांना थांबविले. दोघे थांबले. राजा विक्रमाने चाकू मागविला व स्वत:चे पाय त्याने कोरण्यास सुरवात केली. त्यात कमळ चिन्ह स्पष्ट दिसू लागले. ते पाहून ज्योतिषी हतबल झाला. तेव्हा राजा म्हणाला, ''हे ज्योतिषी महाराज, आपल्या ज्ञानात कोणतीच कमतरता नाही. परंतु आपल्या कामाच्या चौफेर डिंग्या मारत फिरू नका, त्याची वारंवार परीक्षा घेऊ नका. मी जंगलात हिंडत असताना आपली चर्चा ऐकली होती. तुम्हाला जंगलात लाकुडतोड्याच्या वेशात मीच भेटलो होतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi