Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जर्मनीने उपान्त्य फेरी गाठली

जर्मनीने उपान्त्य फेरी गाठली
रिओ दी जानेरो , शनिवार, 5 जुलै 2014 (12:48 IST)
जर्मनीने फ्रान्सचा उपान्त्पूर्व फेरीत 1-0 असा पराभव करून शुक्रवारी सलग चौथ्यांदा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उपान्त्य फेरी गाठली आहे.

जर्मनीच्या ह्युमेल्सने 13 व मिनिटाला एकमेव गोल केला. मध्यांतरास 1-0 अशी जर्मनीने आघाडी घेतल्यानंतर फ्रान्सने गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र, फ्रान्सचे बेन्झेमा, ग्रिएझमान आणि वालुएन या आघाडी फळीतील खेळाडूंना जर्मनीचा बचाव भेदता आला नाही.

जर्मनीचे अनेक खेळाडू आजारी असताना आणि श्कोड्रॉन मस्तफी याने मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर त्रस्त झालेल्या जर्मनीने हा विजय मिळविला आहे.

जर्मनीने मध्यांतरानंतर अनेक वेळा जोरदार आक्रमणे केली. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. 80 व मिनिटाला फ्री किकचे रुपांतर फ्रान्सला गोलमध्ये करता आले नाही. 90 मिनिटाचा खेळ संपल्यानंतर चार मिनिटांचा अँडीशनल टाइम मिला होता. त्यापैकी 3.37 मिनिटे झाल्यानंतर फ्रान्सच्या 10 नंबर जर्सी वापरणार्‍या बेन्झेमा याचा जोरदार फटका गोलजाळर्पत पोहोचू शकला नाही. साहजिकच फ्रान्सला  पराभव मान्य करावा लागला.

13 व्या मिनिटाला जर्मनीने पहिला गोल केला. फ्री कीक  मिळल्यानंतर क्रॉस याने डी च्या बाहेरुन जोरदार फटका मारत फ्रान्सच्या  खेळाडूंना चकविले. पाच नंबर जर्सी घालणार्‍या ह्युमेल्सने अत्यंत सुरेख हेडर करीत चेंडू गोलपोस्टला लागून गोलजाळतील उजव कोपर्‍यात  धाडला. फ्रान्सचा गोलरक्षक लिओरीस याला फुटबॉल नेमका कोठे जाणार याचा अंदाजच बांधता आला नाही.

दुसर्‍याच मिनिटापासून जर्मनीने फ्रान्सच्या डी मध्ये धडक मारुन गोल करण्याचा प्रयत्न केला. जर्मनीचा गोल करण्याचा प्रयत्न फ्रान्सच्या बचावफळीने परतवून लावला. पुन्हा चौथ्या मिनिटाला जर्मनीचे आक्रमण फ्रान्सने परतवून लावले.

सहाव्या मिनिटाला फ्रान्सच्या बचाव फळीतील पॅट्रिक इवरा याने मुलेरला अडविले. 31 व्या मिनिटाला जर्मनीला पहिला कॉर्नर मिळाला. 34 व्या मिनिटाला फ्रान्सच्या ग्रिझमान याने सुरेख पास दिला होता. वालबुएना याने डावीकडून गोल मारण्याचा प्रयत्न केला. परंतु जर्मनीच्या   नेूर याने गोल वाचविला. बेन्झेमा याने पुन्हा फटका मात गोल करण्याचा प्रयत्न केला मात्र जर्मनीच्या बचाव फळीने हा प्रयत्नही फोल  ठरविला. 44 व मिनिटाला बेन्झेमाला बरोबरीची संधी मिळाली परंतु नेूर याने योग्य पध्दतीने चेंडू अडवित बचाव केला.

गेल दोन स्पर्धामध्ये जर्मनीने उपान्त्य फेरी गाठलेली आहे. आता विश्वचषकाचे जेतेपद मिळविण्यासाठी जर्मनी हा कट्टर दावेदार मानण्यात येत आहे. गेल्या सोळा सामन्यात जर्मनीने एकही सामना गमावलेला नाही. जर्मनीचे अनेक खेळाडू बेअर्न मुनिच क्लबचे प्रतिनिधित्व करतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi