Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आक्रमण मजबूत करणे, हेच लक्ष्य: उत्थप्पा

आक्रमण मजबूत करणे, हेच लक्ष्य: उत्थप्पा
, मंगळवार, 29 सप्टेंबर 2015 (09:44 IST)
नवी दिल्ली- भारताच्या यजमानपदाखाली होणार्‍या विश्व लीग अजिंक्यपद हॉकी अंतिम स्पर्धा आणि न्यूझीलंडचा दौरा यासाठी भारतीय हॉकी संघ आक्रमण मजबूत करण्याचे लक्ष्य घेऊनच सहभागी होणार आहे. त्यामुळे हे आक्रमक मजबूत करण्याकडेच आमचे जास्त लक्ष्य आहे, असे प्रतिपादन भारतीय हॉकी संघाचा मिडफिल्डर एस के उत्थप्पा याने केले.
 
विश्व लीग अजिंक्यपद स्पर्धेच्या आधी भारतीय संघ सहा कसोटी सामान्यांची मालिका खेळणार आहे. या दौर्‍यात भारताचा संघ सरावादरम्यान ज्या कौशल्यावर अभ्यास करण्या आला, तसेच जे आणखी काही कौशल्य नव्याने शिकले गेले ते दा‍खविण्याचा प्रयत्न करेल, उत्थप्पा म्हणाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi