Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ब्राझील-उरुग्वे संघात अंतिम लढत व्हावी : पेले

ब्राझील-उरुग्वे संघात अंतिम लढत व्हावी : पेले
सावो पावलो , बुधवार, 11 जून 2014 (15:16 IST)
1950 मध्ये घरच्या प्रेक्षकांसमोर खेळताना ब्राझीलला विश्वविजेतेपद मिळवून देण्याचे ब्राझील फुटबॉलपटूंचे स्वप्न अपुरे राहिले, ते पूर्ण होण्यासाठी या वर्षी ब्राझील आणि उरुग्वे संघात अंतिम लढत व्हावी, अशी अपेक्षा फुटबॉल सम्राट पेले यांनी व्यक्त केली आहे.

1950 साली ब्राझीलच्या संघातून पेले खेळले होते. विजेतेपद हुकल्याची खंत त्यांना अजूनही वाटत आहे. त्या पराभवाची परतफेड व्हावी म्हणून ब्राझील-उरुग्वे अंतिम लढत व्हावी, असे त्यांना वाटते. हा पराभव ते विसरलेले नाहीत. 73 वर्षाच पेलेंना याबाबत विचारले असता ते उत्तरले की, ब्राझीलने अंतिम फेरीत धडक मारली परंतु, अर्जेटिना नव्हे तर उरुग्वे प्रतिस्पर्धी असावा व ही लढत ब्राझीलने जिंकावी, असे ते म्हणाले.

यावेळच्या विश्वचषक स्पर्धेत ब्राझील संघाची ताकद कमी मानली जात आहे. परंतु, पेले यांना तसे वाटत नाही. ब्राझीलला कमी लेखून चालणार नाही. संघातील युवा खेळाडूंना मी इतकेच सांगेन की, विश्वचषक स्पर्धेमुळे जगातील प्रत्येकाला ब्राझील काय आहे, हे समजले आहे. आमच्या सुरुवातीच्या काळातही ब्राझीलला कोणीच स्थान दिले नव्हते. पण जेव्हा आम्ही विश्वचषक जिंकला तेव्हा ब्राझीलचे नाव झाले व ते अजूनही कायम आहे, असे ते म्हणाले.

फुटबॉलच्या सामन्यामध्ये तुम्ही 85 मिनिटे सर्वोत्तम खेळ करू शकता. परंतु, अखेरची 5 मिनिटे तुमच्यासाठी निर्णायक ठरतात. या 5 मिनिटात तुम्ही सामन्याचे चित्र पालटू शकता. तेव्हा खेळाडूंनो 90 मिनिटे खेळण्यास सज्ज राहा, असा सल्ला पेले यांनी ब्राझीलच्या खेळाडूंना दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi