Asian Badminton Championship:पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन 22व्या आणि 23व्या स्थानावर पोहोचले आहेत. तर महिला एकेरीत पीव्ही सिंधूला क्रमवारीत घसरण झाली असून ती 12व्या स्थानावर आली आहे
स्टार भारतीय बॅडमिंटन जोडी सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी मंगळवारी कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले. ही भारतीय जोडी जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर पोहोचली आहे. भारतीय जोडीने अलीकडेच बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्येही या भारतीय जोडीने जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर नाव कोरले होते. ध्रुव कपिला आणि एमआर अर्जुन या अन्य भारतीय जोडीने जागतिक क्रमवारीत 23 व्या क्रमांकावर पोहोचण्यासाठी चार स्थानांचा फायदा घेतला.
किदाम्बी श्रीकांत आणि लक्ष्य सेन 22व्या आणि 23व्या स्थानावर पोहोचले आहेत. तर महिला एकेरीत पीव्ही सिंधूला क्रमवारीत घसरण झाली असून ती 12व्या स्थानावर आली आहे.