Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 April 2025
webdunia

प्रसिद्ध कब्बडीपटूची गोळ्या झाडून हत्या

Famous Kabaddi player shot dead
, मंगळवार, 15 मार्च 2022 (13:51 IST)
आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध कब्बडीपट्टू संदीप नांगल अंबियन याची सोमवारी पंजाबमधील मल्लियनमध्ये सुरू असलेल्या सामन्यादरम्यान गोळ्या झाडून हत्या केली. जालंधरच्या मालियन गावात सायंकाळी 6 वाजता कबड्डी चषकादरम्यान अंबिया गावातील संदीपची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली.त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर सुमारे 20 राऊंड गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गोळी बार केल्यावर हल्लेखोर फरार झाले.  
 
जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जालंधरच्या मालियन गावात कबड्डी चषकादरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी नांगल अंबियन गावातील आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू संदीप सिंगवर गोळ्या झाडल्या. गोळ्या त्यांच्या डोक्यात आणि छातीत लागल्या. 
 
गावात कबड्डी स्पर्धा सुरू होती, त्याचवेळी संदीप त्याच्या काही साथीदारांना सोडण्यासाठी बाहेर गेले असता. तेथे काही सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांच्या वर गोळीबार केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

असे सरकार जे मांजरांना द्यायचे 'नोकऱ्या', खाण्यापिण्यासह या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होत्या, जाणून घ्या - रंजक तथ्य