भारताने चमकदार कामगिरी करत कॅनडाचा 10-1 असा पराभव करून पुरुष कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या विजयासह भारत क गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताकडून आदित्य अर्जुन (8 व्या, 43 व्या मि.), रोहित (12 व्या, 55 व्या मि.), अमनदीप लाक्रा (23व्या , 52व्या मि.), विष्णुकांत (42 व्या मि.), राजिंदर (42 व्या मि.), कुशवाह सौरभ आनंद (51व्या मि.) आणि उत्तम सिंग. (58व्या मिनिटाला) गोल केला.
कॅनडाकडून एकमेव गोल ज्युड निकोल्सनने 20 व्या मिनिटाला केला. भारतीय संघ आता उपांत्यपूर्व फेरीत मंगळवारी पूल डी विजेत्या नेदरलँडशी खेळणार आहे.