Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 17 April 2025
webdunia

पीव्ही सिंधू सिंगापूर ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये, सतत दुसऱ्यांदा जिंकली

PV sidhu in quater final of Singapore open
ओलंपिक रजत पदक विजेता पीव्ही सिंधूने डेन्मार्कच्या मिया ब्लिचफिल्ट विरुद्ध थेट गेम जिंकून गुरुवारी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकल क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलं. चौथं स्थानावर असलेल्या सिंधूने जगात 22 क्रमांकाच्या मियाला 39 मिनिटांत 21-13, 21-19 ने पराभूत केलं. 
 
डॅनिश खेळाडू विरुद्ध तिची सलग दुसरी विजय आहे. जगात 6 क्रमांकावर असलेल्या सिंधूचा पुढील सामना वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप कांस्य पदक विजेता चिनी खेळाडू काई यांच्याबरोबर होईल.
 
पहिल्या गेममध्ये सिंधूने सुरुवातीला 3-0 ने आघाडी घेऊन शेवटपर्यंत टिकून राहिली पण दुसऱ्या गेममध्ये एकेकाळी 8-8 असा स्कोर होता. यानंतर, भारतीय खेळाडू एका वेळी 11-15 अशी मागे देखील होती. गेल्या महिन्यात इंडिया ओपनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणाऱ्या सिंधूने परतून स्कोर 17-17 केलं आणि मग सामना जिंकण्यासाठी उशीर केले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लोकसभा 2019 : महिलांना त्यांचं स्वत:चं मत ठरवण्याचा अधिकार किती असतो?