Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिस्तभंगाचा सुमित नागलला बसला फटका

शिस्तभंगाचा सुमित नागलला बसला फटका
युवा टेनिसपटू सुमित नागलला शिस्तभंगाचा जोरदार फटका बसला असून भारताच्या डेव्हिस चषक संघातील स्थान त्याला याचमुळे गमवावे लागले आहे.
 
वास्तविक, सुमितने काहीच कालावधीपूर्वी स्पेनविरूद्ध डेव्हिस चषक पदार्पणात प्रभावी कामगिरी साकारली होती. पण न्यूझीलंडविरूद्ध आगामी मालिकेसाठी त्याला वगळले गेले आहे. गतवर्षी जुलैमध्ये कोरियाविरूद्ध चंदिगढमध्ये मालिका सुरू असताना सुमितने सकाळच्या सराव सत्रात सहभाग घेतला नव्हता. त्यावरून त्याच्यावर ही कारवाई केली गेली.
 
सुमित अवघ्या 19 वर्षांचा आहे. त्याच्यात बरीच गुणवत्ता आहे पण भारतीय संघात समावेश असतानादेखील खेळाडूंकडून अशी आगळीक होत असेल तर ते निश्चितच स्वकारार्ह ठरत नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सचिनची समिती होणार बाद