Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सौंदर्या तुझं नाव ऐश्वर्या राय

सौंदर्या तुझं नाव ऐश्वर्या राय
IFMIFM
विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा आज वाढदिवस. तिचे हसरे व्यक्तिमत्त्व आणि नाजूक शरीरयष्टी पाहून ती आज वयाच्या पस्तीसाव्या वर्षात पदार्पण करतेय यावर विश्वासच बसत नाही. पस्तीशीच्या आसपास लोक थोराड होऊ लागतात. पण ऐश अजूनही आकर्षक वाटते. लग्न झाल्यानंतरही तिची मोहकता कायम आहे हे विशेष. 'ती पाहताच बाला कलिजा खलास झाला' हे तिच्याकडे आजही बघून वाटते यातच सारे काही आले.

लग्नानंतर ऐश्वर्या आई होणार असल्याची 'टूम' अधून मधून येत असते. ऐश्वर्या मात्र या अफवांचाही आनंद लुटत असते. अर्थात तिच्या आईपणासाठी बरेच जण आसुसले आहेत. अगदी तिचे सासरे व बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनाही आजोबा होण्याची इच्छा आहे.

webdunia
IFMIFM
तारकांचे कुटुंब
ऐश्वर्याचे कुटुंब भारतातील 'स्टार' कुटुंब आहे. 'घरात हसरे तारे असताना मी पाहू कशाला नभाकडे' अशी तिची अवस्था झाल्यास नवल नाही. अमिताभ तर महानायक आहे. जया बच्चन यांनीही एक काळ गाजवला आहे. ऐश्वर्याचा नवरा अभिषेक करीयरच्या शिखरावर आहे. स्वतः ऐश्वर्या तर काय? आंतरराष्ट्रीय पातळीवरची कलाकार बनली आहे. कॉन इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आलेली ती पहिलीच भारतीय कलावंत यातच काय ते आले.

webdunia
IFMIFM
ऐशमागील शुक्लकाष्ठ
यश मिळत असतानाही ऐशच्या मागे काही शुक्लकाष्ट लागली आहेत. सलमान हे त्यातलं पहिलं शुक्लकाष्ट. ऐश्वर्याचा हा पहिला प्रियकर. आता तिच्यापासून लांब असला तरीही त्यांच्या जुन्या कहाण्या उकरून मीडीयावाले सतत दाखवत असतात.
'देवदास' नंतर ऐश व किंग खान यांच्यात दरी निर्माण झाली आहे. अमीर खान व ऐश यांच्यातील संबंधही काही फार चांगले नाहीत. मि. परफेक्शनिस्ट आमीर तब्बेतीत काम करतो. त्या उलट ऐश सतत धावपळीत असते. तिच्या डेट्स मिळविणे मुश्किल असते. त्यामळेच की काय ऐश-अमीर यांची जोडी पडद्यावर कधी झळकलीच नाही. अक्षय कुमार, गोविंदा, संजय दत्त, अजय देवगण व हृतिक रोशन यांच्यासोबत तर ऐश किती तरी चित्रपट करू शकते. त्यातल्या गोविंदा व संजय दत्त यांच्या करियरचा आता अस्त होत आला आहे. त्यामुळे तिला परफेक्ट नायक म्हणून तिचा नवरा अभिषेकशिवाय सध्या कुणीही नाही. अभिषेकसोबत तिचे काही चित्रपट येत आहेत. त्यामुळे बॉलीवूडमध्ये खान विरुद्ध बच्चन परिवार यांच्यात शीतयुद्ध सुरू आहे.

webdunia
IFMIFM
ऐशच्या वयाच्या काही नायिका आता घरच्या उद्योगाला लागल्या आहेत. राणी मुखर्जी, प्रीती झिंटा यांचे मार्केट डाऊन झाले आहे. सुष्मिता सेन ही ऐशची एकेकाळची प्रतिस्पर्धी. पण तीही आता स्पर्धेतून बाद झाली आहे. आता कॅटरीना कैफ, दीपिका पदुकोण व प्रियंका चोप्रा या नायिकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पण फ्लॉप चित्रपटामध्येच त्या जास्त व्यस्त आहेत. असे चित्रपट करण्याची विश्वसुंदरीला आवश्यकताच नाही.

असे असले ती मीडियामध्ये ऐश्वर्यावर लाइमलाइट नेहमीच पडतो. कधी सौंदर्य तर कधी बच्चन परिवाराची सून म्हणून ती कायम बातमीत असते. काही दिवसांपूर्वी ऐशच्या सुंदर डोळ्यांना 'जगातील सर्वात सेक्सी डोळे' ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. थोडक्यात काय ऐश म्हणजे बातमी आहे. अगदी कुठलीही बातमी तिच्याबाबतीत होऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi