Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Budget 2020-21 : 'GST'ची सुधारित आवृत्ती एप्रिलपासून लागू

Budget 2020-21 : 'GST'ची सुधारित आवृत्ती एप्रिलपासून लागू
, शनिवार, 1 फेब्रुवारी 2020 (12:28 IST)
वस्तू आणि सेवा कराची अर्थातच GSTची सुधारित आवृत्ती येत्या एप्रिलपासून लागू केली जाईल, अशी घोषणा अर्थसंकल्पी भाषणादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केली. ही प्रणाली सुधारित आणि सुटसुटीत असेल असे देखील सांगण्यात आले.
 
मागील दोन वर्ष 'जीएसटी'ने आव्हानांचा सामना केला असून बदल करण्यासाठी जीएसटी परिषदेने काम केलं. देशात 2017 मध्ये जीएसटी लागू झाला होता. जीएसटीचे अडथळे दूर करण्याचे प्रयत्न जीएसटी कॉन्सिलकडून केले जात असल्याचस त्यांनी सांगितले. 
 
आतापर्यंत आपल्याला नवीन 16 लाख करदाते मिळाले असल्याचे माहिती देखील सीतारामन यांनी दिली. जीएसटीमधील कपातीमुळे ग्राहकांचे जवळपास 1 लाख कोटी वाचले असा दावा सीतारामन यांनी केला. जीएसटी कपातीमुळे दरमहा एका कुटुंबाची 4 टक्के बचत झाल्याची त्या म्हणाल्या. जीएसटीने देशाला एक केले कारण वन टॅक्स वन नेशनची संकल्पना जीएसटीने दृढ झाली. वस्तूंवरील कर कमी झाला, लघू आणि मध्यम उद्योगांना फायदा झाला. 
 
अर्थव्यवस्थेसाठी जीएसटी ऐतिहासिक ठरला. या एप्रिल महिन्यापासून जीएसटी परतावा भरण्याची नवी सोपी प्रणाली आणणार असे अर्थमंत्री यांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

#Budget2020 - आरोग्य क्षेत्रासाठी काय?